Mumbai, फेब्रुवारी 11 -- Stock Market Updates : किरकोळ विक्री (FMCG) क्षेत्रातील दिग्गज कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडनं डिसेंबर अखेरचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालांबरोबरच कंपनीनं शेअरहोल्डर्सना भरघोस लाभांशाची भेट दिली आहे. कंपनीनं एका शेअरवर ११० रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअरनं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत इतर गोष्टींबरोबरच आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रति इक्विटी शेअर ११० रुपये अंतरिम लाभांश (प्रत्येकी १० रुपये अंकित मूल्य) जाहीर केला आहे. लाभांश ७ मार्च २०२५ पर्यंत दिला जाईल.

हेही वाचा: पाच दिवसांत सेन्सेक्स २,५०० अंकांनी गडगडला! काय आहेत या घसरणीमागची ५ कारणं? वाचा!

३१ डिसे...