Mumbai, फेब्रुवारी 5 -- Page Industries Share Price : गार्मेंटस अँड फॅशनेबल कपड्यांच्या उद्योगातील आघाडीची कंपनी पेज इंडस्ट्रीजनं आज गुंतवणूकदारांना मोठी खूशखबर दिली. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ साठी १५० रुपये प्रति इक्विटी शेअरचा तिसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळानं आज (म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५) झालेल्या बैठकीत २०२४-२५ च्या तिसऱ्या अंतरिम लाभांशाला मंजुरी दिली. अंतरिम लाभांश देयकासाठी रेकॉर्ड डेट १३ फेब्रुवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. लाभांशाची रक्कम ७ मार्च २०२५ किंवा त्यापूर्वी खात्यात जमा होईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा करोत्तर नफा (PAT) ३४ टक्क्यांनी वाढून २०४.७ कोटी रुपये झाला आहे. तिमाहीचा महसूल वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनी वाढून १३१३ कोटी रुपये झाला आहे, तर एबिटडा ३३.६ टक्क्यांन...