Mumbai, जानेवारी 29 -- KPIT Dividend News : भारतातील एक प्रमुख आयटी कंपनी केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निकाल जाहीर करतानाच कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याची घोषणा केली आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा निव्वळ नफा १९.२७ टक्क्यांनी वाढून १८६.९७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीला कामकाजातून मिळालेला महसूल देखील गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १२५६.९६ कोटी रुपयांच्या तुलनेत १७.६ टक्क्यांनी वाढला आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजीजनं प्रति शेअर २.५० रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं २९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण न केलेल्या आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि त्यास मंजुरी ...