Mumbai, फेब्रुवारी 12 -- Railway Stock Dividend News : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) संचालक मंडळानं आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांसह गुंतवणूकदारांना भेट दिली आहे. कंपनीनं प्रति शेअर ३ रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

आयआरसीटीसीनं शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळानं मंगळवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रत्येकी २ रुपये अंकित मूल्याच्या प्रत्येक शेअरवर ३ रुपये म्हणजेच @१५० टक्के दरानं दुसरा अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक मंडळानं त्यास मंजुरी देखील दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमानं (PSU) अंतरिम लाभांशासाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी गुरुवार, २० फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्च...