Mumbai, फेब्रुवारी 4 -- Castrol India Dividend News : कॅस्ट्रॉल इंडियाचा शेअर मंगळवारी ७ टक्क्यांनी वधारून १९३.७५ रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली. डिसेंबर तिमाहीत कंपनीला २७१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे.

कॅस्ट्रॉल इंडियानं प्रति शेअर ९.५० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशात ४.५० रुपयांच्या विशेष लाभांशाचा समावेश आहे. कंपनीनं अंतिम लाभांशासाठी मंगळवार, १८ मार्च २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

कॅस्ट्रॉल इंडियाचा तिसऱ्या तिमाहीतील नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी आणि सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढला आहे. कॅस्ट्रोल इंडियाच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा २८४ रुपये आ...