Mumbai, जानेवारी 26 -- Dividend Stock : लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅक्सेलिया सोल्यूशन्स इंडिया या कंपनीनं घसघशीत डिविडंडची घोषणा केली आहे. कंपनी एका शेअरवर ५० रुपये लाभांश देणार आहे. लाभांशाची रेकॉर्ड डेट ३० जानेवारी ही आहे.

कंपनीनं नुकतीच स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ५० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. कंपनीनं या लाभांशासाठी ३० जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावं या दिवशी रेकॉर्ड बुकमध्ये राहतील, त्यांना लाभांशाचा लाभ मिळणार आहे.

यावर्षी कंपनी पहिल्यांदाच एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार करणार आहे. २०२४ मध्ये कंपनीनं दोन वेळा कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंडची भेट दिली होती. एकद...