Mumbai, जानेवारी 27 -- Jeet Adani Marriage News : भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या अदानी कुटुंबानं नुकतीच प्रयागराज येथील पवित्र महाकुंभमेळ्याला भेट दिली. यावेळी अदानी कुटुंबानं गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याच्या लग्नाची तारीख जाहीर केली. जीतचा विवाह दिवा जैमिन शहा हिच्याशी होणार आहे.

जीतचं लग्न ७ फेब्रुवारीला होणार असून ते साधं आणि पारंपारिक पद्धतीनं होईल. लग्नाचा सोहळा इतर सर्वसामान्य कुटुंबासारखाच होईल, असं खुद्द गौतम अदानी यांनी सांगितलं. अदानी कुटुंबाच्या या घोषणेनंतर आता गौतम अदानी यांच्या धाकट्या सुनेची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया कोण आहे जीत अदानी याची होणारी पत्नी दिवा जैमिन शहा.

> दिवा जैमीन शाह ही भारतातील एका प्रतिष्ठित आणि गर्भश्रीमंत कुटुंबातील आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमिन शाह यांची ती ...