भारत, नोव्हेंबर 25 -- भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आता लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. खुद्द कार्तिकने याचे संकेत दिले आहेत. ३७ वर्षांचा कार्तिक नुकताच ऑस्ट्रेलियातील T20 विश्वचषक २०२२ ही स्पर्धा खेळला होता.

कार्तिकला विश्वचषकासाठी फिनिशर म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. आता त्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून लवकरच निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. कार्तिकने एक भावनिक पोस्ट शेअर करताना सर्वांचे आभार मानले आहेत.

'ऋषभ पंत संघावर ओझं झालाय, त्याला हाकला! प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते'

दिनेश कार्तिकने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कार्तिकने या व्हिडिओद्वारे संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. यामध्ये खेळाडू आणि कुटुंबीयांसह संघातील खेळाडू दिसत आहेत. व्हिडिओमध्ये कार्तिकची जुळी मुले आणि कुटुंबह...