Mumbai, एप्रिल 26 -- Health Care: मधुमेह ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे जी रक्तातील साखरेच्या वाढीव पातळीमुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण करते. जेव्हा स्वादुपिंड अपुऱ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करते किंवा जेव्हा शरीराच्या पेशी इन्सुलिनच्या परिणामांना प्रभावीपणे प्रतिसाद देत नाहीत तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. मधुमेह ही आरोग्याची एक गंभीर स्थिती असल्यामुळे हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि दृष्टी कमी होणे यांसारखे दुष्परिणाम संभवतात. जगातील मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी १७% रूग्ण भारतात आढळत असल्याने आपल्या देशाला 'मधुमेहाची राजधानी' अशी निराशाजनक ओळख प्राप्त झाली आहे. जवळपास ८० कोटी भारतीयांना मधुमेह आहे. भारतातील वाढत्या मधुमेहाचा संबंध प्रामुख्याने जीवनशैलीतील बदलांशी आहे. आहाराच्या सवयींमध्ये झपाट्याने होणारे बदल, ब...