Mumbai, मे 6 -- Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र मंगळ, बुध,राहु,नेपच्युनशी संयोग करीत आहे. या हालचालींचा काही राशींवर नकारात्मक तर काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. सरस्वतीयोग, लक्ष्मीयोग त्याचबरोबर ग्रहणयोगात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

धनु राशीच्या लोकांसाठी कामकाजात अडथळा निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण-तणावात्मक राहील. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. आज तुमचा शत्रुपक्ष वरचढ राहील. तुमच्या कामात मानसिकदृष्या त्रासदायक दिवस आहे. मानसिक स्वास्थ सांभाळावे लागेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभा...