Beed, जानेवारी 29 -- Santosh Deshmukh case : दिल्ली दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत असेल की, मी राजीनामा द्यावा तर मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.

धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सरपंच हत्या प्रकरणात नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का? या प्रश्नावर मुंडे यांनी म्हटले की, माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी न...