भारत, जानेवारी 28 -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी आणि शाहनवाज नवाजुद्दीन सिद्दीकी नुकतेच एका मुलाचे आई-वडील झाले आहेत. देवोलीनाने अद्याप आपल्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. नुकताच देवोलीनाने सोशल मीडियावर बाळाच्या बारश्याचे फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने लेकाचे नाव काय ठेवले याविषयी देखील माहिती दिली आहे.

देवोलीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आणि मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वोलीना बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. कपाळाला चंदनाचा टीका दिसत आहे. फोटोमध्ये तिने मुलाचा चेहरा लपवला आहे. तसेच तिच्या शेजारी तिचा पती शाहनवाज असल्याचे दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.

देवोलीनाने सोशल मीडियावर मुलाचा फोटो शेअर करत, 'या नव्या सदस्याचे कुटुंबात स्वागत करताना आम्ही आनंदी आ...