New delhi, फेब्रुवारी 8 -- Delhi election 2025 Update : भारतीय जनता पक्षाने २७ वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन करत आम आदमी पक्षाला सत्तेतून पायउतार केले आहे. पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. 'भारत माता की जय' आणि 'जय गंगा मैया'च्या घोषणांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, आज दिल्लीच्या लोकांमध्ये उत्साह आणि शांती आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा विजय ऐतिहासिक आहे. हा काही सामान्य विजय नाही. दिल्लीच्या जनतेने 'आप'ला हाकलून दिले आहे. दिल्लीला 'आप-दा'पासून मुक्ती मिळाली आहे. दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे. आज दिल्लीत विकास, दूरदृष्टी आणि विश्वासाचा विजय झाला आहे. आज दिल्लीला घेरलेल्या संधीसाधूपणा, अराजकता, अहंकार आणि 'आप-दा'चा पराभव झाला आहे. या विजयाबद्दल म...