New delhi, फेब्रुवारी 5 -- DelhiExitPoll2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला बंपर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पी-मार्क, चाणक्य स्ट्रॅटेजीज, मॅटराईज आणि पीपल्स इनसाइट सह बहुतेक सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. पण आतापर्यंत केवळ दोन सर्व्हेमध्ये 'आप'च्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माइंड ब्रिंक (Mind Brink) आणि विप्रेसिड सर्व्हेमध्ये आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

माइंड ब्रिंकच्या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल ४४ ते ४९ जागा मिळवून पुन्हा सत्तेत येतील, तर भाजप पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकून विरोधी पक्षात राहील. भाजपला २५ ते २९ जागा मिळतील, तर काँग्रेसला शून्य किंवा एक जागा मिळेल, असा अंदाज...