नई दिल्ली। पीटीआई, फेब्रुवारी 8 -- Delhi assembly Election Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी करत २७ वर्षापासूनचा सत्तेचा दुष्काळ संपवला आहे. भाजप बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. पक्षाला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रीय पक्ष असे आहेत ज्यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नोटाला ०.५७ टक्के मते मिळाली तर बहुजन समाज पक्षाला ०.५५ टक्के आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला अवघी ०.०१ टक्के मते मिळाली.

बसप आणि सीपीएम हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. आकडेवारीनुसार, भाकप आणि जेडीयूला अनुक्रमे ०.०१ आणि ०.५३ टक्के मते मिळाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ६०.५४ टक्के मतदान झाले होते. ज्यात ९४,५१,९९७ लोकांनी मतदान केले. १.५५ कोटींहून अधिक लोक मतदार ...