New delhi, फेब्रुवारी 8 -- Delhi Election Result 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने २७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपने ४९ जागांवर आघाडी घेत कलांमध्ये बहुमत मिळवले आहे. २०१३ मध्ये अण्णा हजारेंच्या 'क्रांती पथ'मधून बाहेर पडून राजकारणात उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांचा पहिला राजकीय पराभव झाला आहे. मोफत वीज, पाणी, बस प्रवास अशा योजना राबवून देखील त्यांचा पराभव खूप गोष्टी स्पष्ट करणारा आहे. मुस्लीमबहुल भाग असो, गांधी नगर असो वा पूर्व दिल्लीतील पटपड़गंजसारखा व्यापारी भाग असो, आम आदमी पक्षाला सर्वच ठिकाणी धक्का बसला आहे, विविध घटकांमध्ये आपला जनाधार गमावल्याचे स्पष्ट झाले आहे. याची अनेक कारणे आहेत, जी निवडणुकीवेळीच स्पष्ट झाली होती, पण अरविंद केजरीवाल आपल्या नावावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत होते. ज...