Delhi, फेब्रुवारी 8 -- Delhi Elections Resul 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष चांगलाच पिछाडीवर पडला असून आम आदमी पक्षाचे प्रमुख नेतेही आपल्या जागा वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि भाजपचे प्रवेश वर्मा यांच्यात चुरशीची लढत झाली यात केजरीवालांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांना जंगपुरा येथून पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालकाजीमधून आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधूडी यांच्यावर निसटता विजय मिळवत आपली जागा वाचवली आहे. एकूण जागांच्या बाबतीत भाजप सध्या ४९ जागांवर आघाडीवर आहे आणि आप २१ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

दिल्लीत भाजपच्या प्रचंड उदयामागे पंतप्रधान नरे...