New delhi, फेब्रुवारी 8 -- दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून दिल्लीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपने ४८ जागांसह दोन तृतीयांश जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अशीच कामगिरी करत एकूण ४९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ३२ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत भाजपच्या कामगिरीची पुनरावृत्ती त्याच मार्गावर झाली आहे. दुसरीकडे विजयाची हॅटट्रिकची संधी असलेल्या आम आदमी पक्षाला सत्ता तर गमवावी लागलीच, शिवाय मानहानीकारक पराभवही सहन करावा लागला आहे. पक्षाचे सर्वात मोठे नेते आणि संस्थापक, संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

जनतेचा निर्णय आम्हाला मान्य; आम्ही चांगला लढा दिला, दिल्ली हातातून निसटल्यावर काय म्हणाले केजरीवाल? VIDEO

आपच्या पराभवाने भाजप तर खूश आह...