Mumbai, फेब्रुवारी 8 -- Delhi Assembly Elections Result: तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पक्ष (BJP) दिल्ली विधानसभेत (Delhi Elections) पुनरागमन करताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. तर, दिल्लीत सलग दोन वेळा सरकार चालवणारा आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) २८ जागांवर घसरताना दिसत आहे. यावेळीही काँग्रेसच्या (Congress) पदरात निराशाच पडली. भाजपच्या या मोठ्या विजयाचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) साजरा करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात नव्हे तर दिल्ली भाजप कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तेथे तयारी ...