Mumbai, फेब्रुवारी 8 -- Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कल ९ नंतर येण्यास सुरुवात होईल. दुपारपर्यंत पक्षाची भूमिका स्पष्ट होण्यास सुरुवात होईल.

दिल्लीतील ११ जिल्ह्यांतील १९ मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या निकालाचे रिअल टाइम अपडेट मिळण्यासाठी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसच्या मुख्यालयात विशेष व्यवस्था करण्यात आली. पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यालयात उपस्थित राहून पत्रकार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

स्ट्राँग रूममध्ये आयोग आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या कडक देखरेखीखाली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) ठेव...