New delhi, फेब्रुवारी 9 -- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांपैकी सुमारे ८० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या तीन जागा वगळता सर्व जागांवरील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आले. शनिवारी जाहीर झालेल्या निकालात आप, भाजप आणि मित्रपक्ष जनता दल (युनायटेड) आणि लोजपा (रामविलास) यांच्या सर्व उमेदवारांनी आपले डिपॉझिट वाचविण्यात यश मिळवले.

५ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या ६९९ उमेदवारांपैकी ५५५ (७९.३९ टक्के) उमेदवारांचे डिपॉझिट बुडाले. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा जागांच्या बाबतीत भोपळाही फोडता आला नाही, शिवाय ६७ उमेदवारांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. ही काँग्रेससाठी मोठी नामुष्की आहे. २०१३ पर्यंत सलग तीन वेळा दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रे...