नई दिल्ली, फेब्रुवारी 17 -- Delhi Earthquake : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले. पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता मध्यम असली तरी इमारती व घरे शहारले. भूकंपाचे धक्के काही ठिकाणी तीव्र होते यामुळे साखर झोपेत असलेले नागरिक जागे होऊन भीतीने घराच्या बाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदु दिल्लीत असल्याने एनसीआरमधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या केंद्रबिंदुची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. दिल्लीव्यतिरिक्त नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबादसह संपूर्ण परिसरात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे नागरिक झोपेतून जागे झाले. नागरिक घाबरले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नवी दिल्ली परिसरात होता. हे केंद्र अरावली परिसरातील धौ...