Delhi, फेब्रुवारी 17 -- Delhi Earthquake video : दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात सोमवारी ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी राजधानीत पाच किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाममुळे साखर झोपेत असलेले दिल्लीकर उठून घराबाहेर पळाले.

दिल्लीत झालेल्या भूकंपाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या भूकंपाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि "सर्वात भीतीदायक काही मिनिटे" असल्याचं म्हटलं आहे. राजधानी आणि आजूबाजूच्या भागातील अनेक नागरिकांनी ही व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. एका व्हिडिओमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक त्यांच्या घराबाहेर घाबरलेल्या अवस्थेत उभे आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी एएनआय या वृत्तसंस...