Mumbai, जानेवारी 28 -- Chinese AI Deepseek Model : चीनची आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी डीपसीकनं विकसित केलेल्या नव्या एआय चॅटबॉटनंं जगात धुमाकूळ घातला आहे. या एआय मॉडेलमुळं एनव्हिडिया कॉर्पचे सहसंस्थापक जेन्सन हुआंग यांच्यासह जगातील ५०० श्रीमंतांना डीपसीक एकूण १०८ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. डीपसीकमुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

हुआंग यांच्या संपत्तीत २० टक्क्यांनी घट झाली आहे. एका दिवसात त्यांना २०.१ अब्ज डॉलरचे नुकसान सोसावं लागलं आहे. ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार, ओरॅकल कॉर्पचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांना २२.६ अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. मात्र, ही रक्कम त्यांच्या मालमत्तेच्या केवळ १२ टक्के आहे. डेल इंकचे मायकेल डेल यांना १३ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. टेक दिग्गज एलन मस्क यांनाही ६.७४ अ...