Delhi, जानेवारी 28 -- China DeepSeek AI : चीनच्या स्टार्टअप डीपसीकने एआय मॉडेल्ससह तंत्रज्ञानाच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. डीपसीकमुळे मोठ्या टेक कंपण्यांचं टेंशन वाढलं आहे. डीपसीक एआय चॅट जीपीटी पेक्षाची वरचढ ठरले आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अ‍ॅप्लिकेशन बनले आहे.

अमेरिकेतील कोणत्याही एआय मॉडेलच्या पेक्षाची चांगली सेवा डीपसीक देत आहे. हे एआय अ‍ॅप खूप कमी खर्चात तयार करण्यात आले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ग्लोबल एआय सर्कलचं लक्ष वेधलं आहे. डीपसीक-व्ही ३ ला ६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी किंमतीच्या एनव्हीडिया एच ८०० चिप्सपासून संगणकीय शक्ती देण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या साह्याने प्रोग्रामिंग आणि विविध माहिती काही क्षणात यूझर्स मिळवत आहेत.

अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध टॉ...