Delhi, जानेवारी 31 -- India will develop own AI model like Deepseek : भारत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात उतरण्याच्या तयारीतआहे. या बाबतचे संकेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारत स्वतःचे जेनेरेटिव्ह एआय मॉडेल तयार करत आहे. जगात सध्या डीपसीक या मेड इन चायना एआय मॉडेलची चर्चा होत असतांना भारताने देखील स्वत:च्या एआय मॉडेलबद्दल घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारतात या निमित्त येऊ शकतात, असे देखील वृत्त आहे.

उत्कर्ष ओडिशा कॉन्क्लेव्हदरम्यान वैष्णव यांनी या बाबत घोषणा केली. वैष्णव म्हणाले, भारत स्वतःचे जेनेरेटिव्ह एआय मॉडेल तयार करत आहे. ओडिशामध्ये एआय डेटा सेंटर उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे एआय कॉम्प्युट फॅसिलिटीद्वारे ऑपरेट केले...