Delhi, फेब्रुवारी 13 -- Deepika Padukone To Students On Mental Health : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'परीक्षा पे चर्चा २०२५' सत्रात सहभाग घेतला होता. यावेळी तिने नैराश्यावर मात कशी करावी हे सांगतांना तिचे वैयक्तिक अनुभव शेअर केले. मानसिक आरोग्यासाठी जनजागृती व संवादाची गरज असल्याचे दीपिकाने यावेळी म्हटले. भावना व्यक्त करणे आणि योग्य वेळी मदत घेणे खूप महत्त्वाचं आहे असे देखील दीपिका यावेळी म्हणाली.

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यार्थ्यांना अनेक विषयांवर टिप्स दिल्या. यावेळी दीपिकाने विद्यार्थ्यांना तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व तो कमी करण्यासाठी व नैराश्याला कसा लढा द्यावा या बद्दल मार्गदर्शन केले. नैराश्य कसे हाताळवे?, परीक्षा आणि स्पर्धा यांच्यात मानसिक संतुलन कसे राखावे? यावर दीपिका पदुकोणने विद्यार...