भारत, फेब्रुवारी 16 -- Dadasaheb Phalke: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज १६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी. ते चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जातात. दादासाहेबांनी निर्माण केलेल्या चित्रपटांची जादू आज भारतभर पसरली आहे. त्यामध्ये अनेक सुधारणा होऊन चित्रपटसृष्टी हे एक मोठे क्षेत्र तयार झाले आहे. आजवर हजारो कलावंत घडवणाऱ्या या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठमोळ्या व्यक्तीच्या उत्तुंग कर्तृत्वाने रोवली गेली होती. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ३० एप्रिल १८७० रोजी झाला. लहानपणापासूनच दादासाहेब हे इतर मुलांपेक्षा वेगळे होते. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक...