Mumbai, नोव्हेंबर 29 -- Dadar Railway Station: मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वात बिझी स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकातील गर्दी कशी विभागली जाईल यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं गांभीर्यानं विचार सुरू केला आहे. त्यासाठी दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचं रुंदीकरण करण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या जलद गाड्यांतील प्रवाशांना दादर स्थानकात दोन्ही बाजूंनी चढता-उतरता यावं हा यामागचा उद्देश आहे.

दादर स्थानकात मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीसाठी सहा प्लॅटफॉर्म आहेत. जलद गाड्यांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवरून लांब पल्ल्याच्या गाड्याही धावतात. दादर स्थानकात दररोज जवळपास ५ लाख प्रवासी ये-जा करतात. येथून दिवसाला २२६ गाड्या जातात, त्यातील ५० टक्के ट्रेन कल्याणच्या दिशेने जातात. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून लांब पल्ल...