Mumbai, मे 24 -- Cyclone Remal News: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातील हे पहिले मान्सूनपूर्व चक्रीवादळ असून हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नावे देण्याच्या पद्धतीनुसार त्याचे नाव रेमल ठेवण्यात येणार आहे.

आयएमडीच्या शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, चक्रीवादळ शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल. हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतरित होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रुपात पोहोचेल.

Chhattisgarh News : छत्त...