भारत, जानेवारी 28 -- दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत असून वर्षभराच्या काळात नवी मुंबईतील नागरिकांना तब्बल ४४० कोटी रुपये गमवावे लागले आहे. नवी मुंबई पोलिसांनी २०२४ या वर्षभरातील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १५० कोटी ९७ लाख रुपयांची नागरिकांची सायबर फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ४१ कोटी ३२ लाख रुपये गोठविण्यात आले असून ६ कोटी ९२ लाख रुपये वसूल करून तक्रारदारांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म (एनसीसीआरपी) पोर्टलवर २९६.७१ कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी २७.५३ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत.

सायबर फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेणे ही तशी वेळखाऊ प्रक्रिया असते. फसवणूक क...