Mumbai, मार्च 23 -- आयपीएल २०२५ चा सर्वात मोठा सामना आज (२३ मार्च) रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी ५ वेळा आयपीएल चॅम्पियन ठरले आहेत.

एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळणार नाही. कारण गेल्या मोसमात तीन सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आज सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करेल.

दुसरीकडे, चेन्नई आपल्या जुन्या आणि क्लासिक शैलीत दिसणार आहे. हा संघ ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर एमएस धोनीसारखा वरिष्ठ खेळाडूही संघात आहे.

सीएसके आणि एमआय यांच्यातील या मोठ्या संघर्षात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते हे आपण येथे जाणून घेऊया?

हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस...