Mumbai, मार्च 23 -- इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असून यात सीएसकेने नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, यानंतर मुंबईने २० षटकात ९ बाद १५५ धावा केल्या आहेत. सीएसकेला विजयासाठी १५६ धावा करायच्या आहेत.

या सामन्यात मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. यानंतर मुंबईने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने अखेर संघ छोट्या धावसंख्येवर गडगडला.

मुंबईने ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. संघाकडून टिळक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तर या एका सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. शे...