Mumbai, मार्च 24 -- MS Dhoni pats Vignesh Puthur : आयपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात (२३ मार्च) चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने १९.१ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

या सामन्यातून विघ्नेश पुथूर याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केले. विघ्नेश पुथूरने पदार्पणात शानदार गोलंदाजी केली. या युवा गोलंदाजाने४ षटकात ३२ धावा देऊन ३ बळी घेतले, मात्र रचिन रवींद्रच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकला.

२३ वर्षांच्या विघ्नेश पुथूर याने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी महेंद्रसिंह धोनीने सामना संपल्यानंतर विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप ...