Mumbai, मे 5 -- आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाच वेळचा चॅम्पियन सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले असून संघ गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. मात्र, यंदाच्या मोसमात सीएसकेच्या संघात एका नव्या खेळाडूचा समावेश झाला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने उर्विल पटेलला सामील करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पटेलने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत २८ चेंडूत शतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. हे एका भारतीयाचे संयुक्त सर्वात जलद टी-२० शतक आहे.

सीएसकेने दुखापतग्रस्त वंश बेदीच्या जागी २६ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज पटेलला संघात घेतले आहे. बेदीच्या डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला यंदाच्या मोसमातून बाहेर पडावे लागले होते. त्...