भारत, नोव्हेंबर 28 -- पोर्तुगालचा कर्णधार आणि फुटबॉल जगतातला सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोला १८ अब्ज रुपयांची (१८०० कोटी) ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाच्या अल नसर एफसीने रोनाल्डोला ही ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल नसर क्लबला रोनाल्डोसोबत ३ वर्षांचा करार करायचा आहे. म्हणजेच दरवर्षी हा क्लब रोनाल्डोला ६ अब्ज रुपये (६०० कोटी) देण्यास तयार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार फुटबॉलर रोनाल्डो आणि क्लबमध्ये काही महिन्यांपूर्वीच या कराराची चर्चा सुरू झाली होती. सौदी अरेबियाच्या क्लबने रोनाल्डोला दिलेल्या ऑफरनुसार, रोनाल्डो एका दिवसात १.६७ कोटी रुपये कमवेल. तर प्रत्येक तासाला रोनाल्डोची कमाई ७ लाख रुपये असणार आहे. तसेच, या करारानुसार, रोनाल्डोची दर मिनिटाची कमाई सुमारे ११ हजार ६४६ रुपये असेल. या क्लबमध्ये सामील झ...