भारत, नोव्हेंबर 29 -- कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात सोमवारी (२८ नोव्हेंबर) पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यात सामना झाला. H गटातील या सामन्यात पोर्तुगालने २-० असा विजय मिळवत राऊंड ऑफ १६ फेरीत आपले स्थान निश्चित केले. पोर्तुगालसाठी या सामन्यात ब्रुनो फर्नांडिसने दोन्ही गोल केले. त्याचा पहिला गोल बराच गाजला आणि आतादेखील चर्चेत आहे. पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने त्या गोलवर आपला दावा केला होता, परंतु रेफ्रींनी तो फेटाळून लावला.

त्यामुळे रोनाल्डो थोडासा नाराज दिसला. याची सोशल मीडियावरदेखील बरीच चर्चा रंगली. काही चाहत्यांना असे वाटते की रोनाल्डोने तो गोल केला आहे, तर काहींना वाटते की तो गोल ब्रुनो फर्नांडिसने केला आहे. विशेष म्हणजे यासाठी रोनाल्डोने पत्रकार पियर्स मॉर्गनला मेसेजही केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले...