भारत, जानेवारी 31 -- बँकेच्या अनेक ग्राहकांकडे हल्ली क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्ड दोन्ही असतात. हे कार्ड दिसायला अगदी सारखेच असतात. कारण ते दोन्ही प्लास्टिक कार्ड असतात. आणि दोन्ही कार्ड आर्थिक व्यवहारासाठी वापरले जातात. तथापि, कार्य, उद्दिष्ट आणि आर्थिक सुरक्षेबाबत दोन्ही कार्डमध्ये फरक असतो. क्रेडिट आणि एटीएम कार्डचे वैशिष्ट्य आणि त्याचा काय काय उपयोग होऊ शकतो हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी माहिती येथे देणार आहोत.

बँका तसेच वित्तीय संस्था आपल्याला क्रेडिट कार्ड देतात. क्रेडिट कार्ड हे मुळात ग्राहकासाठी आर्थिक लाभाचे माध्यम आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहक एकप्रकारे बँकेकडून कर्ज घेण्यास पात्र असतो. क्रेडिट कार्डच्या ग्राहकाला एका ठराविक कालावधीच्या आत घेतलेले कर्ज परतफेड करावी लागते. क्रेडिट कार्ड एकप्रकारे ग्राहकाल...