भारत, मार्च 5 -- मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात सेलू येथे झालेल्या सीपीआय(एम)च्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात ४७ वर्षीय डॉ. अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विद्यमान राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी या पदावर फेरनिवड होण्यास नकार दिला. आयुर्वेदिक डॉक्टर असलेले डॉ. अजित नवले हे सीपीएम पक्षाचे देशातील सर्वात तरुण राज्य सचिव आहेत.

डॉ. अजित नवले हे २५ वर्षांपूर्वी २००० मध्ये विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून पक्षात सामील झाले. ते २०१६ पासून किसान आघाडीचे राज्य सरचिटणीस आणि २०२२ पासून राष्ट्रीय सहसचिव आहेत. त्यांच्या कुटुंबाला, नवलेवाडी गावाला, अकोले तालुक्याला आणि अहमदनगर जिल्ह्याला (आता अहिल्यानगर) स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट चळवळीचा दीर्घ वारसा लाभला आहे. डॉ. अजित नवले आणि त्यांच्य...