Delhi, मे 8 -- AstraZeneca Corona Vaccine: कोरोना महामारी रोखण्यासाठी AstraZeneca ने तयार केलेल्या कोविशील्डमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिमाण होत असल्याची कबुली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटेन मधील न्यायालयात दिली होती. कंपनीच्या या कबुली जबाबामुळे खळबळ उडाली होती. यावर मोठा वाद झाल्यामुळे तसेच ही लस सुरक्षित असल्याचे सांगूनही कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ही लस बाजारातून परत मागवण्याच्या निर्णय AstraZeneca या फार्मा कंपनीने घेतला आहे. यामध्ये भारतात बनवलेल्या कोविशील्ड लसीचाही यात समावेश आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले की या लसीचे सर्व डोस हे पुन्हा परत मागवण्यात येत आहेत.

AstraZeneca द्वारे निर्मित कोरोना लस भारतात Covishield या नावाने तयार करण्यात आली होती. पुण्यातील सीरम येथे या लसीची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या लसीच्या दुष्प...