Mumbai, फेब्रुवारी 15 -- Cyber Crime: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीने लोकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशार दिला. फेडएक्सच्या कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन फेडएक्स यांच्याकडून करण्यात आले.

गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सायबर गुन्हेगार नोकरीचे, लग्नाचे, लॉटरीचे आमिष दाखवून नागरिकांची लूट करत आहेत. अशातच फेडएक्स कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले. दरम्यान, कशा पद्धतीने ही फसवणूक केली जाते आणि अशा फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

हे घोटाळेबाज आपण फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आ...