Chennai, जून 2 -- चेन्नई: तटरक्षक दल, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाने संयुक्त कारवाई करत सोने तस्करांनी समुद्रात फेकलेले तब्बल ११ किलो सोन्यासह एकूण ३२ किलो सोन्याचा साठा समुद्राच्या तळातून बाहेर काढण्यात आला आहे. या सोन्याची किंमत तब्बल २० कोटी २० लाख रुपये असून या सोन्याची भारतातून श्रीलंकेत तस्करी केली जात होती.

भारतीय तटरक्षक दलाने डीआरआय आणि कस्टम्सविभागासोबत केलेल्या कारवाई दरम्यान, तामिळनाडूमधील मन्नारच्या खाडीतील दोन मासेमारी नौकांमधून ३२ किलो ६८९ ग्राम सोने आणले जात असल्याची माहिती मिळाली. यामुळे यंत्रणांनी या मार्गे येत असलेल्या सर्व जहाजांवर चोख नजर ठेवली होती. दरम्यान, एक संशयित जहाज त्यांना दिसले. मात्र, या जहाजवरील सोने समुद्रात फेकून देण्यात आले.

तटरक्षक दल आणि DRI द...