Mumbai, एप्रिल 16 -- Cm Eknath shinde reaction after meet salman khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्याघराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता सलमान खानची वांद्रेतील त्याच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. सलमानच्या घरासमोर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पकडण्यात आलेले आरोपी बिश्नोई गँगचे आहेत. याआधीही बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ही मुंबई आहे. आम्ही बिश्नोई गँग खतम करु. येथे कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

Vishal Pa...