भारत, मार्च 13 -- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधानांशी राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला 'माईनिंग हब' म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. शिवाय नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे नागपूर येथील विमानतळाच्या कामातील अडसर लवकरच दूर होतील, असं सूत्...