Mumbai, डिसेंबर 6 -- ख्रिसमसचा सण जवळ आला आहे. आता सण साजरा करायचा म्हंटल्यावर त्याची तयारी तर करायलाच हवी. यासाठी शॉपिंग करावी लागेल. मुंबईत बर्फ, थंडी जाणवत नाही. पण तारांच्या दिव्यांनी सजलेल्या खिडकीतून बघत बघत हॉट चॉकलेट पिणे, ख्रिसमस ट्री आणून त्याला डेकोरेट करणे, पार्टी ठेवणे हे तर आपण मुंबईत नक्कीच करू शकतो. यासाठी तुम्हाला बेल्स, दागिने आणि कँडी केन्सची खरेदी करावी लागले. यासाठीच मुंबईतील ५ महत्त्वाची आणि फेमस मार्केट्स बद्दल सांगत आहोत. जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता.

हिल रोड मार्केट, बांद्रा

इथले रस्ते वर्षभर कपडे, शूज आणि स्ट्रीट फूड विकणारी दुकाने आणि स्टॉल्सने खचाखच भरलेले असताना, ख्रिसमस जसजसा जवळ येतो तसतसे चित्र बदलते. एलईडी तारांमध्ये गुंडाळलेले ट्री दिसू लागतात. यासोबतच बेल्स, विंड चाइम, चमकदार सजावटीचे बॉल्स असं सगळं साम...