Mumbai, फेब्रुवारी 8 -- Chocolate Day 2025 History : व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस नात्यात गोडवा आणण्यासाठी 'चॉकलेट डे' म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी ९ फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रियजनांना, मित्रांना किंवा क्रशला चॉकलेट देऊन त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. तथापि, हा दिवस फक्त भेटवस्तू देण्यासाठी नाही; तर नातेसंबंधांमध्ये गोडवा आणण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, छोट्या छोट्या गोष्टी देखील एखाद्याला आनंदी करू शकतात. चॉकलेट हे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकमध्ये त्याला विशेष स्थान देण्यात आले आहे. चॉकलेट डे साजरा करण्याची सुरुवात कधी आणि कशी झाली, व्हॅलेंटाईन वीकमध्ये 'चॉकलेट डे'चा समावेश करण्याचे कारण आणि महत्त्व ...