Mumbai, फेब्रुवारी 8 -- Chocolate Day 2025 Wishes In Marathi : सध्या सगळीकडेच 'व्हॅलेंटाईन डे'चा फीव्हर आहे. प्रेमात पडलेली तरूणाई व्हेलेंटाईन डे साजरा करण्यापूर् हा संपूर्ण आठवडा साजरा करते. या व्हेलेंटाईन वीक मध्ये प्रेम, नातं यांच्याशी निगडीत एक खास दिवस साजरा केला जातो. ९ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन वीकमध्ये 'चॉकलेट डे' साजरा केला जातो. चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे, जी आपला मूड चटकन लिफ्ट करू शकते. चॉकलेट डे सेलिब्रेशन लव्ह पार्टनरला चॉकलेट्स देऊन केलं जातं. व्हेलेंटाईन डे आणि सेलिब्रेशन म्हणजे गोड तर पाहिजेच. चॉकलेट शिवाय प्रेमाचं सेलिब्रेशन तसं अपूर्णच वाटू लागतं. पण, आता चॉकलेट्स अनेक स्वरूपात मिळतात. गोड प्रमाणेच कडू, व्हिगन, डाएट नुसारही चॉकलेट्स उपलब्ध आहेत. या खास दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला चॉकलेटसोबत खास मेसेज देखील देऊ शकता. ...