Mumbai, एप्रिल 24 -- Side Effects of Drinking Chilled Water: तुम्हीही अशा लोकांपैकी असाल जे कडक उन्हातून घरी आल्याबरोबर लगेच फ्रिजमधून थंड पाणी काढून पितात, तर आताच सावध व्हा. आपण नकळतपणे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात. होय, जास्त थंड पाणी तुमची तहान भागवू शकते पण हळूहळू ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवते. आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि माणसाला आजारी बनवते. फ्रिजचे थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते येथे जाणून घ्या.

Liver Health Tips: शरीरात दिसणारी ही लक्षणं देतात यकृतासंबंधी विकारांचे संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका

आयुर्वेदानुसार थंड पाण्यामुळे व्यक्तीची पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे अनेकदा व्यक्तीला ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, उलट्या आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. पचनाला अग्नी ...