भारत, फेब्रुवारी 27 -- छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा हिंदी चित्रपट छत्तीसगडमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी घेतला आहे. 'छावा' हा केवळ चित्रपट नसून आपल्या ऐतिहासिक परंपरा, धाडस आणि स्वाभिमानाला आदरांजली असल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा समजून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हा सिनेमा पाहावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुघल आणि इतर आक्रमकांविरुद्ध जोरदार लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे विलक्षण धाडस, त्याग आणि सामरिक प्रतिभा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यातून त्यांची अदम्य भावना आणि राष्ट्राप्रती असलेली अतूट बांधिलकी जिवंत होते आणि राष्ट्रवादाची तीव्र भावना दृढ होते, असे सरकारने म्हटले आहे.

'छावा...