Mumbai, जानेवारी 27 -- Chhaava Movie Scene Clash : नुकताच विकी कौशलच्या 'छावा' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या झलकेसाठी सगळेच प्रेक्षक आसुसलेले होते. मात्र, हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक आपला तीव्र संताप जाहीर करू लागले. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता विकी कौशल नाचताना आणि लेझीम खेळताना दाखवण्यात आला होता. हे दृश्य पाहून प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर यावर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी प्रतिक्रिया देत, हा सीन काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे.

'छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरम...